गुन्हे वार्ता

आधी फेसबुकवर मैत्री मग घरी बोलावून बळजबरीने केला शारीरिक अत्‍याचार; शहादा तालुक्‍यातील धक्‍कादायक प्रकार; मनरदच्‍या तरुणाला बेड्या

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : तीन वर्षांपूर्वी फेसबुकवर झालेली ओळख एका तरुणीला महागात पडली आहे. सोशल मीडियावरील ओळख आणि त्‍यातून झालेल्‍या मैत्रीचा गैरफायदा घेत या तरुणीला घरी बोलावून तिच्‍यावर बळजबरीने शारीरिक अत्‍याचार करण्‍यात आल्‍याचा धक्‍कादायक प्रकार शहादा तालुक्‍यात येथे घडला आहे. या प्रकरणी संबंधित तरुणीच्‍या तक्रारीवरून शहादा पोलिसांनी मनरद येथील सुनील सारंगधर पंजाबी (३३) या तरुणावर गुन्‍ह दाखल करून त्‍याला बेड्या ठोकल्‍या आहेत.
​पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि सुनील सारंगधर पंजाबी (३३, रा. मनरद, ता. शहादा) यांची साधारण दोन ते तीन वर्षांपूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्यानंतर त्यांचे फोनवर बोलणे सुरू झाले.
​१ फेब्रुवारी २०२६ रोजी सदर तरुणी सुनील पंजाबी याच्‍या आमंत्रणावरून मनरद येथे आली होती. तेथे तिने दोन दिवस मुक्काम केला. या काळात आरोपीने तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, या प्रकाराची वाच्‍यता केल्‍यास जीवे मारून टाकेल, अशा शब्‍दांत तिला ठार मारण्याची धमकीही दिली. दरम्‍यान, ​पीडित तरुणीने अखेर शहादा पोलीस ठाण्यात सुनील पंजाबी याच्‍याविरोधात फिर्याद नोंदवली. त्‍यावरून भारतीय न्याय संहितेच्या ​कलम ६४,​ ३५१ (२) व ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी सुनील पंजाबी याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सूर्यवंशी करीत आहेत.

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना सतर्क राहावे. सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा कुणी घेण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यास किंवा अन्‍य काही तक्रार असल्‍यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
– हेमंतकुमार पाटिल (पोलिस निरीक्षक, शहादा)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button