महाराष्ट्र
नंदुरबार, शहाद्याच्या प्रांताधिकार्यांची जालन्याला बदली; कनवारिया झाले जि.प. सीईओ, तर शर्मांकडे महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्य शासनाने प्रशासनात मोठे बदल केले असून, राज्यातील २५ आयएएस अधिकार्यांची एकाच वेळी बदली करण्यात आली आहे. यामध्ये नंदुरबारच्या प्रांताधिकारी अंजली शर्मा आणि शहाद्याचे प्रांताधिकारी कृष्णकांत कनवारिया यांचाही समावेश आहे.
राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार कृष्णकांत कनवारिया यांची आता जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली असून, अंजली शर्मा आता जालना महानगर पालिकेच्या आयुक्त असतील. दरम्यान, या बदल्यांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील दोन प्रांताधिकार्यांची पदे रिक्त झाली आहेत. कारण गुरुवारी राज्य शासनाने काढलेल्या बदल्यांच्या यादीत या दोन अधिकार्यांची नावे असली तरी त्यांच्या जागी नव्याने कुणाची नियुक्ती करण्यात आली याचा उल्लेख मात्र नाही.



