गुन्हे वार्ता

दारू पिऊन आला अन्‌ कारण नसताना आई – वडिलांवर तुटून पडला; शहादा तालुक्यातील धक्कादायक घटना!

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) :  दारूच्या नशेत कोणत्याही कारणाविना एकाने आई-वडिलांना जबर मारहाण केल्याची घटना शहादा तालुक्यातील भावसार मढी येथे घडली. मुलाच्या महाराणी आई-वडील असे दोघेही जखमी झाले असून, मुलावर शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुक बाईंडिंगचा व्यवसाय करणारे अशोक मणिलाल भावसार (७९, रा. भावसार मढी शहादा, ता. शहादा, जि. नंदुरबार) व व त्यांची पत्नी मंगलाबाई भावसार अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. १२ एप्रिलला रात्री ९.३० च्या सुमारास अशोक भावसार जेवण करून घराच्या समोर असलेल्या ओट्यावर बसले होते. याच वेळी त्यांचा मुलगा मनोज गावातून दारू पिऊन घरी आला. वडिलांना पाहून त्याने कोणतेही कारण नसताना अचानक शिवीगाळ सुरू केली. तसेच त्यांच्या अंगावर जाऊन गेला. काही कळण्याच्या आतच मनोजने वडील अशोक यांना तोंडावर चापटा मारून खाली पाडले. तसेच नंतर हातातील कड्याने त्यांच्या डोक्यात वार करून जखमी केले. यावेळी मनोज ची आई मंगलाबाई यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता मनोजने त्यांनाही शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
दुसऱ्या दिवशी सोमवारी अशोक भावसार यांनी शहादा पोलिस ठाणे गाठून मुलगा मनोज याच्याविरोधात तक्रार नोंदवली. त्यावरून त्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकॉ छोटूलाल शिरसाठ करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button