गुन्हे वार्ता

नंदुरबार जिल्हा कारागृहात राडा; शौचालय वापराच्या कारणावरून एका कैद्याची दुसऱ्याला मारहाण; हाताला जबर दुखापत

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : आपल्याला ठेवलेल्या बरॅकमधील शौचालयात न जाता दुसऱ्या बरॅकमधील  शौचालयाचा वापर करीत असल्याने हटकल्यावर एका कायद्याने दुसऱ्या कायद्याला ढकलून जखमी केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार जिल्हा कारागृहात घडली. याप्रकरणी सहकारी कायद्याच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी संबंधित गैरवर्तन करणाऱ्या कायद्याविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंजन कमलेश इंचीलीकर हा एका गुन्हा कैद्याची शिक्षा भोगत असून, त्याला न्यायालयीन बंदी म्हणून नंदुरबार जिल्हा कारागृहाच्या पुरुष सर्कल विभागातील बरॅक क्रमांक चार मध्ये ठेवण्यात आले आहे. याच विभागात शेजारी बरॅक क्रमांक तीन असून, तेथे अन्य एका प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या न्यायालयीन बंदी मनोज रमेश साने याला ठेवण्यात आले आहे. प्रत्येक बरॅकसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था असताना इंचीलीकर हा नेहमीच आपल्या बरॅकऐवजी शेजारच्या बरॅकमधील शौचालयाचा वापर करीत असे. १९ एप्रिल रोजी साने याने इंचीलीकर याला हटकून ‘तुझ्या बरॅकऐवजी आमच्या बरॅकमधील शौचालयाचा वापर का करतो’, अशी विचारणा केली. याचा राग आल्यानंतर इंचीलीकर याने साने याच्या अंगावर धावून जात त्याला जोरदार ढकलून दिले. या गडबडीत साने खाली पडून त्याच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली.
याप्रकरणी कारागृहातील हवालदार अनिल शामराव धनगर यांच्या तक्रारीवरून कैदी गुंजन कमलेश इंचीलीकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक बहिरम सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button