नंदुरबार शहर

‘महिला शक्तीचा स्वाभिमान, विरोधकांनी पुन्हा केला अपमान’; शिवसेनेच्‍या वाघिणींच्‍या घोषणांनी दणाणले नंदुरबार; काँग्रेससह विरोधकांचा केला निषेध

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पक्षाचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांच्या आदेशान्वये शिवसेनेच्या महिला आघाडीचा वतीने शहरात हे निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत यांनी केले. ‘महिला शक्तीचा स्वाभिमान, विरोधकांनी पुन्हा केला अपमान’, ‘नारी शक्तीला विरोध करणाऱ्यांच्या शिवसेना पक्षातर्फे निषेध’ असे घोषवाक्य असलेले फलक हाती घेत अनेक महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
यावेळी ज्योती राजपूत म्हणाल्या, विरोधकांकडून नारिक शक्तीच्या अपमान केला जात आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नाममंजूर झाल्याने महिला विकासाच्या प्रगतीला बाधा निर्माण होईल. विरोधक फक्त या विधेयकाकडे राजकारण म्हणून पाहत आहेत. ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ हा महिलांना राजकीय सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण टप्पा असून, यामुळे लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना किती टक्के प्रतिनिधित्व मिळणार होते.
यावेळी ज्योती राजपूत यांच्‍यासह तालुका प्रमुख अंजना वसावे, शहर प्रमुख वैशाली माळी, शाखाप्रमुख पुनम अग्रवाल, जोशना भट, मीनल चौधरी, जागृती चौधरी, गायत्री सैंदाणे, आशा राजपूत आदींची उपस्थिती होती.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button