गुन्हे वार्ता

आधी अश्लील बोलून युवतीला छेडले, मग तिला वाचवणाऱ्यावर चाकू हल्ला; नंदुरबारच्या भर चौकातील थरार; पोलिसांनी आवळल्या युवकाच्या मुसक्या!

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : भरचौकात १९ वर्षीय युवतीला अश्लील बोलून तिचा हात धरीत विनयभंग करण्यासह तिच्या बचावाचा प्रयत्न करणाऱ्या युवकावर चाकू हल्ला करून एका युवकाने दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यासह त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात राहणारी एक १९ वर्षीय तरुणी सुभाष चौकातील पावभाजी सेंटरवर पावभाजी खाण्यासाठी गेली होती. याच वेळी कुणाल सदाशिव मराठे (रा. रायसिंगपुरा, नंदुरबार) हा मित्रासोबत तिथे आला. सदर तरुणी दिसताच कुणालने तिला पाहून अश्लील बोलण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार पाहून शेजारीच उभा असलेल्या राकेश नावाच्या तरुणाने कुणालला ‘मुलगी आहे, तोंड सांभाळून बोल’, असे सुनावले. यामुळे कुणाल संतापला. काही कळण्याच्या आतच त्याने स्वतः जवळील चाकू काढून राकेशच्या शरीरावर वार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने राकेशने सावध होत हा वार चुकवला. यामुळे संतापलेल्या कुणालने युवतीचा हात धरून तिला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला आणि शिवीगाळ सुरू केली. सोबतच राकेशला जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नंदुरबार शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुणालला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button