गुन्हे वार्ता

ओळखीतील व्‍यक्‍तीच्‍या तावडीतून बचावली नंदुरबारची तरुणी; निर्जनस्‍थळी नेऊन अत्‍याचाराचा प्रयत्‍न; विरोध करताच मारहाणीसह मोबाईल, कागदपत्रे पळवली

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : पुण्‍याच्‍या भोर तालुक्‍यातील नरसापूर येथील ४ वर्षीय चिमुकलीला अत्‍याचार करून ठार मारल्‍याची घटना ताजी असतानाच नंदुरबार जिल्‍ह्यातील एक २६ वर्षीय तरुणी अशाच भयानक प्रसंगातून बचावल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. जळगावमध्‍ये ओळखीतीलच व्‍यक्‍तीकडून निर्जनस्‍थळी नेऊन या तरुणीवर अत्‍याचाराचा प्रयत्‍न करण्‍यात आला. विशेष म्‍हणजे या तरुणीने विरोध केल्‍यानंतर तिच्‍यावर अत्‍याचाराचा प्रयत्‍न करणार्‍याने तिचा मोबाईल व कागदपत्रे पळवून नेले.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, जळगावच्‍या खोटेनगर भागात १० एप्रिल रोजी घडलेल्‍या या घटनेप्रकरणी भागवत गोविंदा चव्‍हाण (रा. वाघनगर, जळगाव) असे गुन्हा‍ दाखल करण्‍यात आलेल्या व्‍यक्‍तीचे नाव आहे. नंदुरबार जिल्‍ह्यातील एक तरुणी नोकरीनिमित्त जळगाव येथे राहते. याच दरम्‍यान तिची भागवत चव्‍हाण याच्‍याशी ओळख झाली होती. १० एप्रिल रोजी भागवतने ओळखीचा गैरफायदा घेत तिला जळगावच्‍या खोटेनगर भागातील निर्जनस्‍थळी नेले. या ठिकाणी त्‍याने या तरुणीवर अत्‍याचाराचा प्रयत्‍न केला.
यावेळी या तरुणीने जिवाच्‍या आकांताने भागवतचा विरोध करून त्‍याच्‍या तावडीतून सुटका करून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. यामुळे संतापलेल्‍या भागवतने तिला मारहाण केली. तसेच तिचा मोबाईल व कागदपत्रे हिसकावून घेत पडकले जाण्‍याच्‍या भीतीने तेथून पळ काढला.
यानंतर तरुणीने नंदुरबार गाठून तेथील पोलीस ठाण्‍यात भागवत चव्‍हाण याच्‍याविरोधात तक्रार नोंदवली. त्‍यानुसार तेथे गुन्‍हा दाखल झाला. आता हा गुन्‍हा जळगाव तालुका पोलीस ठाण्‍यात वर्ग करण्‍यात आला असून, पुढील तपास त्‍या ठिकाणी सुरू आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button