गुन्हे वार्ता

मानसिक छळ, धमक्‍यांना कंटाळून युवकाची गळफास लावून आत्‍महत्‍या; धडगाव तालुक्‍यातील धक्‍कादायक प्रकार; एकावर आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्‍याचा गुन्‍हा

धडगाव (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : तू आणि तुझी बायको सतत माझ्‍या बायकोविरोधात तक्रार का करता, असा जाब विचारीत सातत्‍याने केला जात असलेला मानसिक छळ आणि धमक्‍यांना कंटाळून २१ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आतम्‍हत्‍या केल्‍याची धक्‍कादायक घटना धडगाव तालुक्‍यातील शेलदाचा बेडापाडा येथे उघडकीस आली आहे या प्रकरणी एकावर धडगाव पोलीस ठाण्‍यात आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्‍याचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, जेलसिंग तुवाज्‍या पावरा (२१, रा. शेलदाचा बेडीपाडा, ता. धडगाव, जि. नंदुरबार) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या तर प्रताप बाला पावरा (रा. शेलदाचा बेडीपाडा) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍याचे नाव आहे. या प्रकरणी वंदना तुवाज्‍या पावरा यांनी फिर्याद दाखल केली होती.
प्रताप आणि जेलसिंग पावरा या दोघांच्‍या पत्‍नींमध्‍ये अंगणवाडी मदतनीस म्‍हणून कामाला लागण्‍याची स्‍पर्धा होती. यात प्रतापची पत्‍नी अंगणवाडी मदतनीस म्‍हणून नोकरीला लागली. यानंतर जेलसिंगची पत्‍नी सातत्‍याने तिच्‍याविरोधात संबंधित विभागाच्‍या अधिकार्‍यांकडे तक्रारी करीत असे. या रागातून प्रताप सातत्‍याने जेलसिंगला ‘तू आणि तुझ्री बायको माझ्‍या बायकोविरोधात सतत तक्रारी का करता’, असा जाब विचारीत त्‍याला जीवे मारण्‍याच्‍या धमक्‍या देत असे. या सततच्‍या मानसिक छळाला आणि धमक्‍यांना कंटाळून अखेर जेलसिंगने १३ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्‍या सुमारास घरी कुणी नसल्‍याचे पाहून गळफास लावून घेत आत्‍महत्‍या केली, असे वंदना पावरा यांनी फिर्यादीत म्‍हटले आहे.
या घटनेपासून प्रताप पावरा फरार असून, धडगाव पोलीस त्‍याचा शोध घेत आहेत. सध्‍या या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button