गुन्हे वार्ता

गोरक्षक सेलची धडाकेबाज कारवाई; गोणीत भरून वाहनातून विक्रीसाठी नेले जाणारे ८५ किलो गोमांस जप्‍त; तिघांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : बकरी ईदच्‍या पार्श्वभूमीवर अवैधरित्‍या होणारी गोवंश आणि गोमांसाची होणारी तस्‍करी रोखण्‍यासाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या गोरक्षक सेलने धडाकेबाज कारवाई करीत गोमांसाचा मोठा साठा जप्‍त करण्‍यात यश मिळविले आहे. नंदुरबार शहरात केल्‍या गेलेल्‍या या कारवाईत तब्‍बल ८५ किलो गोमांस जप्‍त करण्‍यात आले असून, त्‍याची किंमत सुमारे ५ लाख १७ हजार रुपये आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्‍यातील बिलाडी परिसरातून माळीवाडा भागात एका चारचाकी वाहनातून (क्र. जीजे १८ डी ७९२२) अवैधरित्‍या गोमांस विक्रीसाठी आणले जात असल्‍याची माहिती जिल्‍हा पोलीस अधीक्षकांच्‍या मार्गदर्शनाखाली विशेष गोरक्षक सेलला मिळाली होती. यानंतर गोरक्षक सेलच्‍या पथकाने तातडीने महात्‍मा फुले पुतळा परिसरात सापळा रचला. थोड्याच वेळात सदरील संशयित वाहन येताना दिसताच पोलीस पथकाने सदरील वाहन अडवून थेट झाडाझडती सुरू केली.
यावेळी वाहनात मागील सीटवर पांढर्‍या रंगाच्‍या गोणीत गोवंशीय मांस भरून ठेवल्‍याचे आढळले. या गोमांसाचे वजन तब्‍बल ८५ किलो भरले. त्‍याची बाजारातील किंमत तब्‍बल ५ किलो १७ हजार रुपये आहे. पोलिसांनी हे वाहन ताब्‍यात घेतानाच त्‍यातील तिघांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या.
यांनी केली कारवाई…
ही धडाकेबाज कारवाई गोरक्षक सेलचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे, उपनिरीक्षक प्रशांत जाधव, पोलीस हवालदार सुनील येलवे, पोलीस शिपाई विशाल मराठे, ललित गवळी, पंकज चव्‍हाण, रोहित राजपूत आदींनी केली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button