मुख्य बातम्या

रुपाली चाकणकर हाजिर हो! : एसआयटीने बजावले समन्‍स, खरात प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्‍याचे आदेश, रुपाली ठोंबरे म्‍हणाल्‍या, ही तर सुरूवात, अटकच होणार

नाशिक (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शेकडो महिलांचा लैंगिक छळ करणार्‍या नाशिकमधील भोंदूबाबा याला गुरु मानून त्‍याच्‍या चरणी लीन झाल्‍याने अडचणीत आलेल्‍या राज्‍य महिला आयोगाच्‍या माजी अध्‍यक्षा रुपाली चाकणकर यांच्‍या मागे लागलेले शुक्‍लकाष्‍ठ संपायला तयार नाही. खरात प्रकरणाची चौकशी करणार्‍या चाकणकर यांना विशेष तपासणी पथकाने (एसआयटी) चौकशीसाठी हजर राहण्‍यासाठी समन्‍स बजावले आहे. दुसरीकडे, ही तर सुरूवात असून, चाकणकर यांच्‍यावर अटकेची टांगती तलवार असल्‍याचा दावा त्‍यांच्‍याच पक्षाच्‍या रुपाली ठोंबरे यांनी केला आहे.
लिंगपिसाट भोंदूबाबा अशोक खरात याच्‍याशी संबंध उघड झाल्‍यानंतर रुपाली चाकणकर यांना आधी राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षपदाचा तर नंतर राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या महिला विंगच्‍या प्रदेशाध्‍यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला होता. तर त्‍यांच्‍याच पक्षाच्‍या रुपाली ठोंबरे आणि शिवसेनेच्‍या (उबाठा) सुषमा अंधारे यांनी नाशिक पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन खरात प्रकरणात चाकणकर यांना सहआरोपी करून त्‍यांच्‍या अटकेची मागणी केली होती. याच दरम्‍यान मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन[ या प्रकरणात अडकलेला कुणीही कितीही मोठा असला तरी सोडला जाणार नाही, असे स्‍पष्‍ट केले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर अशोक खरात प्रकरणाची चौकशी करणार्‍या एसआयटी पथकावर दबाव वाढला होता. त्‍याच अनुषंगाने एसआयटीने चाकणकर यांना चौकशीसाठी हजर राहण्‍यासाठी समन्‍स बजावल्‍याचे वृत्त टीव्‍ही ९ या वृत्तवाहिनीने दिले आहे.
दुसरीकडे, राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍या रुपाली ठोंबरे पाटील यांनी या प्रकरणात चाकणकर यांना सहआरोपी करण्‍यात आल्‍याचा दावा केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ठोंबरे म्‍हणाल्‍या, चाकणकर यांचा या प्रकरणात असलेले हितसंबंध, त्‍यांनी पोलिसांवर टाकलेला दबाव, राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्ष असूनही त्‍या खरातच्‍या ट्रस्‍टवर सदस्‍य होत्‍या, त्‍यांचे खरातसोबत अनेक फोटो आहेत, हे सर्व पाहता भोंदूबाबा खरातने चाकणकर यांना हाताशी धरून कटकारस्‍थान करून हे रॅकेट तर चालवले नाही ना, असा प्रश्‍न उपस्‍थित होतो. हे सर्व पाहता त्‍यांना कायद्याने सहआरोपी करणे आवश्‍यक आहे. आता त्‍यांना चौकशीसाठी बोलावले याचा अर्थ त्‍यानुसार तपास करून त्‍यांना अटक करून कोर्टात हजर केले जाईल.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button