‘तुझ्या मुलीला माझ्यासोबत झोपायला पाठव, १० हजार देतो’; पोलिस अधिकार्याची कोठडीतील महिलेकडे अजब मागणी; अकोल्यातील धक्कादायक प्रकार
अकोला (वृत्तसंस्था / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यासह सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्याची शपथ घेणार्या पोलिस दलाला लाजेने खाली मान घालायला लावणारे कृत्य अकोल्यातील एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाने (एएसआय) केले आहे. पोलिस कोठडीत असलेल्या एका महिलेकडे या एएसआयने चक्क ‘तुझ्या मुलीला माझ्यासोबत झोपायला पाठव, तुला १० हजार रुपये देतो’ अशी मागणी केल्याने गृहखात्यात खळबळ उडाली आहे. राजेश जाधव असे या निर्लज्ज एएसआयचे नाव असून, त्याच्या या संतापजनक मागणीनंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांचीनी त्याची खरडपट्टी काढतानाच त्याला तत्काळ निलंबित केले आहे.
आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अकोला पोलिसांनी एका महिलेला अटक केली होती. न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावलेल्या या महिलेला सध्या अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करताना याच ठाण्यात कर्तव्यावर असलेला सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेश जाधव या महिलेकडे गेला आणि तिच्याकडे विचित्र मागणी केली. ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे शरीरसुखासाठी पाठव, त्या बदल्यात १० हजार रुपये तुला देतो’, असे जाधव तिला म्हणाला. यामुळे या महिलेल्या तळपायाची आग मस्तकात गेली.
जाधवविरोधात गुन्ह्याची नोंद, तत्काळ निलंबन
रात्रभर संतापातच काढल्यानंतर दुसर्या दिवशी या महिलेने थेट वरिष्ठ अधिकार्यांच्या कानावर घडलेला प्रकार घातला आणि जाधवविरोधात तक्रार नोंदवली. यानंतर जाधव काम करीत असलेल्या सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यातच त्याच्या विरोधात विनयभंगासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, एएसआय राजेश जाधवने केलेल्या या लाजिरवाण्या कृत्याची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकार्यांनी त्याला पोलिस दलातून तत्काळ निलंबित केले.
‘वदीं घातलीयेस ना, ××××× तुला लाज वाटत नाही का?
सामान्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेतलेल्या पोलिस दलात काम करणार्या राजेश जाधवने केलेल्या घाणेरड्या कृत्याने अवघ्या पोलिस दलाला खाली मान घालावी लागत असून, गृहखात्यातही यामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान, हे प्रकरण कानावर आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी तातडीने संबंधित पोलिस ठाणे गाठून राजेश जाधवची खरडपट्टी काढली. एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने तातडीने संबंधित पोलिस ठाणे गाठून राजेश जाधवला खडेबोल सुनावले. ‘वर्दी घातली आहेस ना, असे कृत्य करताना तुला लाज वाटली नाही का ×××××’ अशा शब्दांत जाधवचा समाचार घेतानाच या अधिकार्यांनी त्याच्यावर हात उगारला. मात्र, त्याच्या अंगावरील वर्दीचा मान राखत उगारलेला हात पुन्हा मागे घेतला, अशी चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात राजेश जाधवने केलेल्या लाजिरवाण्याचा कृत्याबद्दल संबंधित वरिष्ठ अधिकार्यांना संताप अनावर झाल्याचे या चित्रफितीत स्पष्टपणे दिसत आहे.



