Uncategorized

एकतर्फी प्रेमातून छळाचा हृदयद्रावक अंत, अल्पवयीन मुलीचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न; नंदुरबार तालुक्यातील तरुणावर गुन्हा

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : एकतर्फी प्रेमातून तरुणाकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून एका अवघ्या १४ वर्षाच्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार तालुक्यात घडली. या मुलीच्या तक्रारीवरून यश ईश्वर गावित नावाच्या तरुणावर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश ईश्वर गावित (रा. तोकरतलाव, ता. व जि. नंदुरबार) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. शालेय शिक्षण घेणाऱ्या सदर मुलीचे वय अवघे १४ वर्ष व तीन महिने असून आरोपीचे तिच्यवर एकतर्फी प्रेम होते. यातूनच तो तिला मोबाईलवर वारंवार संपर्क साधून ‘माझ्याशी बोलत जा. आपण प्रेम करू’, असे म्हणायचा. एवढेच नाही तर, ‘तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी तुला बरबाद करून टाकेल’ अशी धमकीही द्यायचा. याशिवाय गावातील घराजवळील सार्वजनिक नळाजवळ तिला गाठून तो तिला धमक्या द्यायचा.
सप्टेंबर २०२४ पासून ५ एप्रिल २०२५ पर्यंत अशी साधारण सहा- सात महिने या मुलीने त्या माथेफिरू तरुणाचा त्रास आणि छळ सहन केला. मात्र, ती सहन करीत असल्याने त्याची हिंमत वाढत गेली. मात्र, त्याच्याकडून होणारा त्रास असह्य झाल्याने अखेर ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तिने घरात असलेल्या गोळ्या आणि औषधी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांसह आसपासच्या लोकांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती. तिला शुद्ध आल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. तिच्याच फिर्यादीनुसार यश गावित याच्यावर नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८ (१), १०७, ३०७ (१) सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ८ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक जयसिंग परदेशी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button