महाराष्ट्र

अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाला गावकऱ्यांनी चोपले; भर चौकात दिले फटके!

जळगाव / धरणगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गुरु शिष्य परंपरेला काळिमा फासत शिक्षकाने आपल्याच अल्पवयीन विद्यार्थिनीचे चार वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावच्या धरणगाव मध्ये उघडकीस आला आहे. शिक्षकाच्या या नीच नृत्याची माहिती होताच धरणगावकरांनी त्याला भर चौकात चोप दिला. पोलिसांनी नंतर लम नराधम शिक्षकाला अटक केली असून, सध्‍या तो पालिस कोठडीची हवा खात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल जगन्नाथ अहिरे (३७, रा. अमळनेर) असे अटक करण्यात आलेल्या नराधम शिक्षकाचे नाव आहे. राहुलने आधी आपल्याच शाळेत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी गोड बोलून जवळीक साधली. नंतर विश्वास संपादन करीत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या काळात तिचे खासगी फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन राहुल त्या मुलीवर चार वर्षांपासून शारीरिक अत्याचार करीत होता.
गावकऱ्यांचा संताप अनावर झाला
राहुलकडून होणारा त्रास सहन करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर अखेर पीडित मुलीने सर्व प्रकार कुटुंबीयांच्या कानावर घातला. त्यांनी शेजाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. हळूहळू ही माहिती गावभर पोहोचली आणि गावकऱ्यांना संताप अनावर झाला. काही तरुणांसह इतरांनी मंगळवारी सकाळी राहुलला गाठून घडलेल्या प्रकाराबाबत त्याला जाब विचारला. त्याने उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केल्यावर गावकऱ्यांनी त्याला मारहाण सुरू केली. यावेळी भर चौकात त्याला लाथाबुक्क्यांसह लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप देण्यात आला. या मारहाणीचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील करण्यात आला. 
नरोवा कुंजरोवा
गावकऱ्यांकडून बेदम चोप खाल्लेला राहुल नंतर आपण काहीच केले नाही अशी भूमिका घेत स्वतःच रात्री उशिरा पोलीस ठाण्यात गेला. जे घडले ते न सांगता उलट त्याने गावातील काही जण आपल्या खंडणी मागत असल्याची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र परिस्थितीची कल्पना असलेल्या पोलिसांनी त्याला गोड बोलून तेथेच बसवून ठेवले. नंतर त्याच्या भावाला बोलावून सर्व प्रकार सांगितला. यानंतर पीडित मुलीची आई देखील तेथे पोहोचली. त्यांनी राहुलच्या विरोधात रितसर फिर्याद नोंदवली. त्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनी राहुल अहिरे याला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. दरम्यान, राहुल अहिरे शिक्षक असलेल्या संस्थेने ही यासंदर्भात कडक भूमिका घेत त्याच्या निलंबनाची कार्यवाही सुरू केली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button