मुख्य बातम्या

चिमुकलीचे लचके तोडणार्‍या नसरापूर प्रकरणाच्‍या तपासासाठी एसआयटी; सहा अधिकाऱ्यांचे पथक नियुक्‍त; क्रूरकर्मा आरोपी कोर्टात म्‍हणाला, ही मारामारीची किरकोळ केस…

पुणे (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : आपली लैंगिक इच्‍छा पूर्ण करण्‍यासाठी चार वर्षीय चिमुकल्‍या कळीला कुस्‍करून टाकल्‍याच्‍या महाराष्‍ट्र हादरून टाकणार्‍या नसरापूर (ता. धोर, जि. पुणे) प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथक (एसआयटी) करणार आहे. या पथकात सहा अधिकार्‍यांची सरकारने नियुक्‍ती केली असून, यात दोन महिला अधिकार्‍यांचा समावेश आहे.
दरम्‍यान, या बालिकेवर शारीरिक अत्‍याचार करून तिची हत्‍या करणारा क्रूरकर्मा भीमराव प्रभाकर कांबळे (६५, रा. साळवडे, ता. भोर, जि. पुणे) याला पुण्‍यातील विशेष न्‍यायालयाने गुरुवारपर्यंत (दि. ७) पोलीस कोठडी सुनावली आहे. महत्त्‍वाचे म्‍हणजे पोलिसांनी आरोपीला न्‍यायालयात हजर केल्‍यानंतर आरोपीच्‍या चेहर्‍यावर केलेल्‍या कृत्‍याचा कोणताही पश्‍चातापाचा भाव नव्‍हता. उलट त्‍याने ‘किरकोळ भांडणातून मला विनाकारण या प्रकरणात गोवण्‍यात आले आहे’, असे सांगत स्‍वत:चा बचाव करण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, पोलिसांनी सादर केलेले भक्‍कम पुरावे आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेत विशेष न्‍यायाधीश एम.जी. चव्‍हाण यांच्‍या न्‍यायलयाने त्‍याचा दावा फेटाळून लावत त्‍याला ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
नसरापूरच्या घटनेनंतर राज्‍यभर संतापाची लाट उसळली असून, विविध मार्गांनी या घटनेचा निषेध व्‍यक्‍त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर लोकभावना लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करण्यासाठी सरकारकडून हालचाल केली जात आहे. आता नसरापूर प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात दोन महिला अधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 
काय आहे प्रकरण
नसरापूर येथे एक मे रोजी ६५ वर्षीय भीमराव कांबळे या व्यक्तीने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला वासरू दाखवतो असे सांगून गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर दगडाने ठेचून तिला निर्घृणपणे संपवून टाकत तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. दुपारी चिमुकली न दिसल्याने शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृतावस्थेत आढळली. त्यानंतर परिसरातले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button