मुख्य बातम्या

मुलीच्या लग्नासाठी ८ ग्रॅम सोनं, लाडक्या बहिणीला महिन्याला २५०० रुपये अन्‌ बरंच काही!; आश्वासनांच्या सप्तपदीने ‘थलपती’चा विजय!

चेन्नई (वृत्तसंस्था / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : द्रविडी राजकारणाचा अंत करून तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत इतिहास घडवणाऱ्या एस. विजय जोसेफ अर्थात थलपती विजय यांच्या विजयात निवडणुकीआधी त्यांनी सर्वसामान्य जनतेला दिलेल्या साथ महत्त्वाच्या आश्वासनांचा मोठा वाटा असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी आठ ग्रॅम सोनं, कुटुंबप्रमुख महिलेला महिन्याला अडीच हजार रुपयांची आर्थिक मदत, प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी सहा एलपीजी सिलिंडर मोफत या तीनसह  एकूण सात आश्वासनांनी विजय यांना राज्यातील जनतेने पहिल्याच निवडणुकीत सत्तेपर्यंत पोहोचवल्याचे स्पष्ट झाले आहे.
तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीच्या सोमवारी लागलेल्या निकालात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. दोन अक्षांमध्ये विभागल्या गेलेल्या द्रविडी राजकारणाचे चक्र भेदून अभिनेते विजय जोसेफ यांच्या ‘तामिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) या पक्षाने २३३ पैकी तब्बल १०७ जागा जिंकत अभूतपूर्व असे यश मिळवले. या विजयासह या पक्षाने द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पक्षांच्या राज्यातील राजकीय वर्चस्वाला मोठा धक्का दिला.
विजय यांच्या पक्षाने या निवडणुकीला सामोरे जाताना राज्यातील जनतेला सात महत्त्वाची आश्वासने दिली होती. आता यापैकी किती आश्वासनांची पूर्तता होते आणि ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर किती रुपयांचा भार पडतो व तो भार कशा पद्धतीने हाताळला जातो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
ही होती आश्वासने…
१) कुटुंबप्रमुख महिलेला वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत महिन्याला अडीच हजार रुपये दिले जाणार.
२) प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी घरगुती गॅसचे सहा सिलिंडर मोफत दिले जाणार.
३) कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी आठ ग्रॅम सोने दिले जाणार.
४) पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपयांची रक्कम मिळणार.
५) सरकारी बस मध्ये महिलांना मोफत प्रवास.
६) बेरोजगार तरुणांना महिन्याला चार हजार रुपये बेरोजगार भत्ता.
६) पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ केले जाणार.
७) उर्वरित शेतकऱ्यांना ५० टक्के कर्जमाफी.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button