हर्षित धीरज गिरी ठरले नंदुरबारमधील सर्वांत गोंडस बाळ; हिरकणी फाऊंडेशनच्या अनोख्या स्पर्धेत ठरले नंबर वन
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबारमधील हर्षित धीरज गिरी या बालकाला शहरातील सर्वांत गोंडस बाळ अशी नवी ओळख मिळाली आहे. हिरकणी फाऊंडेशन, नंदुरबार या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या हिरकणीचं गोंडस बाळ या अनोख्या स्पर्धेत हर्षित याने पहिला क्रमांक पटकावला. तर त्याची आई राधा गिरी पहिल्या क्रमांकाच्या हिरकणी ठरल्या.
नंदुरबारकरांचे लक्ष वेधून घेतलेल्या आणि उदंड प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. प्रशांत ठाकरे आणि डॉ. प्रीती ठाकरे यांच्या हस्ते झाले. ला. फेमिना क्लबच्या अध्यक्षा रंजना बोरसे, सारिका जमादार, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. प्रियांका पाडवी या यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. हिरकणी फाऊंडेशन च्या अध्यक्षा चेतना गोस्वामी यांच्या प्रास्तविकानंतर अभिनव विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत आणि समूह नृत्य सादर केले. यावेळी हिंदू जागरण मंचचे जिल्हा सहसंयोजक प्रशांत पवार यांनी मनोगत व्यक्त करताना फाऊंडेशनच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
जीनिशा नरेश चौधरी या चिमुकलीने हिरकणीची कथा सादर केल्यानंतर वेदिका नितीश बेडसे हिने शिवगर्जना सादर केली. तिलोत्तमा चौधरी यांनी सूत्रसंचालन तर युवारंग फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. हिरकणी फाऊंडेशनच्या सचिव प्रियंका पाटील, संगीतस`संगिता वाघ, कल्पना पाटील, नीता मराठे, पूजा जाधव, सोनल शर्मा, लीना मराठे, प्रतीक्षा पाटील, दीपाली पाटील, देवेंद्र कासार, ऋषिकेश मंडलिक, शिवम गोस्वामी, परिणिता गोस्वामी, भूमिका पाटील, कामाक्षा पाटील यांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
वन, टू थ्री, उत्तेजनार्थ…
या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार शिवांश हितेश वाघ आणि त्याची आई हितांशी वाघ यांना, तृतीय क्रमांक नुर्वी उमाकांत पवार व तिची आई स्नेहल पवार यांनी पटकावला. याशिवाय श्रीयान प्रफुल्ल चौधरी व त्याची आई सुजाता चौधरी आणि शिवन्या राहुल बेडसे व आई शीतल बेडसे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी स्पर्धकांचाही प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.



