महाराष्ट्र

State News : लाडक्या बहिणींनो जानेवारीचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात; मोबाईल चेक करा अन जाणून घ्या तुमचे पैसे आले का…

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्यातील तमाम महिला वर्गासाठी राज्य सरकारने गुड न्यूज दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारपासून (दि. २३) ही रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने दिली असून, यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे.
महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला १८ फेब्रुवारीला ९८ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली होती. ही रक्कम प्राप्त झाल्यानंतर महिला व बाल विकास विभागाने हे पैसे सोमवारपासून जानेवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम म्हणून त्यांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर महिलांच्या खात्यात जमा होणाऱ्या पैशांचे मेसेज सोमवारी रात्रीपासूनच त्यांच्या मोबाईलवर येण्यास प्रारंभ झाला आहे.
संख्या घटली
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जानेवारी महिन्याच्या १४ तारखेदरम्यान महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. त्यावेळी १ कोटी ६० लाख महिलांच्या खात्यात डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आली होती. त्याआधी या योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या २ कोटी ४० लाख इतकी होती. यानंतर राज्य सरकारने या योजनेच्या लाभार्थी महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक केले होते. त्यात १ कोटी ९० लाख महिला लाभार्थ्यांनी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यापैकी योग्य केवायसी भरणाऱ्या १ कोटी ६० लाख महिला या योजनेच्या अंतिम लाभार्थी राहिल्या. त्यामुळे एवढ्याच महिलांच्या खात्यात महिला व बाल विकास विभागाने डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे पाठवले होते.
अजून संधी गेलेली नाही
ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना तब्बल अनेक महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेले होते. त्यामुळे अनेक महिला या योजनेच्या फायद्यापासून वंचित राहिल्या होत्या. मात्र, आता या चूक झालेल्या महिला लाभार्थ्यांना आता सरकारने ई केवायसीच्या दुरुस्तीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत संधी दिली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button