महाराष्ट्र

ब्रेकिंग न्‍यूज : रुपाली चाकणकरांना ‘कॅप्‍टन’ प्रकरण भोवले; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कोणत्‍याही क्षणी द्यावा लागणार राजीनामा

मुंबई (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नाशिकमधील कॅप्‍टन अशोक खरात प्रकरणात वादाच्‍या भोवर्‍यात अडकलेल्‍या राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रुपाली चाकणकर कोणत्‍याही क्षणी राजीनाम्‍याची घोषणा करण्‍याची शक्‍यता आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच चाकणकर यांना तसे आदेश दिल्‍याचे सांगण्‍यात येत असून, यानंतर चाकणकर उपमुख्‍यमंत्री सुनेत्रा पवार यांच्‍या भेटीसाठी पुण्‍याला रवाना झाल्‍याचे सूत्रांकडून समजते. तेथे पवार यांच्‍या भेटीनंतर त्‍या राजीनाम्‍याची घोषणा करतील, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.
अनेक महिलांच्‍या लैंगिक शोषण प्रकरणात नाशिकमधील स्‍वयांघोषित बाबा अशोक खरात याच्‍यावर गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर रुपाली चाकणकर व खरात यांच्‍यातील कथित संबंधांवरून राज्‍यभर चर्चेला उधाण आले आहे. चाकणकर व खरात यांचे अनेक फोटो समोर आणत विरोधकांनी या प्रकरणात चाकणकर यांना टार्गेट करीत त्‍यांच्‍या राजीनाम्‍याची मागणी लावून धरली होती. या सर्व पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी झालेल्‍या चर्चेत मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी चाकणकर यांना महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा देण्‍याचे आदेश दिल्‍याचे सूत्रांचे म्‍हणणे आहे. त्यामुळे अशोक खरात प्रकरणात आता रुपाली चाकणकरांचा राजीनामा होणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. आता चाकणकरांना या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
याच दरम्‍यान रुपाली चाकणकर यांनी आजच राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. यावेळी त्‍यांनी दाते यांना एक पत्र देऊन खरात प्रकरणाची सखोल चौकशी करण्‍याचे सूचित केले. त्‍यानंतर चाकणकर मुख्‍यमंत्री फडणवीस यांना भेटून तत्‍काळ उपमुख्‍यमंत्री सुनेत्रा पवार यांच्‍या भेटीसाठी पुण्‍याकडे रवाना झाल्‍याचे सांगण्‍यात येते. तेथे त्‍या पवार यांना भेटून राजीनाम्‍याची घोषणा करण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button