महाराष्ट्र

एका आमदाराने पीडितेचा विश्‍वासघात केला अन्‌ भोंदूबाबाला पकडायला उशीर झाला; अशोक खरात प्रकरणात खळबळजनक माहिती समोर

नाशिक (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शेकडो महिलांच्‍या लैंगिक शोषण प्रकरणात अडकलेला विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. खरातच्‍या विकृत कृत्‍यांची माहिती आणि व्‍हीडिओ घेऊन एक पीडित महिला एका आमदारांकडे पोहोचली होती. मात्र, सदरील आमदारांनी पीडितेचा विश्‍वासघात करीत हे व्‍हीडिओ थेट खरातलाच दिल्‍याची चर्चा आहे. मात्र, नंतर पीडितेने दुसर्‍या आमदारांशी संपर्क साधल्‍यावर त्‍यांनी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्‍या कानावर घातले. यानंतरच हे प्रकरण उघडकीस आले, अशी माहिती समोर आली आहे. आता खरातला वाचवणारा आमदार कोण, याबाबतच्‍या चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, एसआयटीकडून चौकशी सुरू असलेला नाशिकचा विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्‍या काळ्‍या कारनाम्‍यांचे प्रकरण खूप आधीच बाहेर येणार होते. खरातकडून झालेल्‍या लैंगिक छळाची माहिती आणि आपल्‍यासोबत झालेल्‍या विकृत कृत्‍यांचे व्‍हीडिओ घेऊन एका आमदारांची भेट घेतली होती. मात्र, सदरील आमदारांनी हे प्रकरण पोलिसांपर्यंत किंवा राज्‍याचे गृहमंत्री असलेल्‍या मुख्‍यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्‍याऐवजी अशोक खरात यालाच ती माहिती पोहोचवली.
सदरील आमदारांनी पीडितेशी केलेल्‍या विश्‍वासघातामुळे खरातला आपले बिंग फुटणार याची कल्‍पना आली होती. यातून मग त्‍याने पीडितेवरच घाव घातला. त्‍याने धाकदपटशा दाखवून प्रकरण दाबण्‍याच्‍या उद्देशाने पीडितेवरच दबाव आणायला सुरूवात केली. तरीही ती ऐकत नसल्‍याने अखेर खरातने तिच्‍या पतीविरोधात तक्रार दाखल करून गुन्‍हा दाखल होईल अशी व्‍यवस्‍था केली. संबंधित आमदारांनी केलेल्‍या विश्‍वासघाताचा मोठा फटका या पीडितेला सहन करावा लागला आणि खरातचे बिंग फुटायला देखील उशीर झाला.
दरम्‍यान, एका आमदारांनी विश्‍वासघात करूनही पीडितेने हार न मानता आणखी एका आमदारांशी संपर्क साधला. या आमदारांनी मात्र प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत तातडीने सगळे प्रकरण थेट मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या कानावर घातले. यानंतर मुख्‍यमंत्र्यांनी लगेच संबंधितांना सूचना दिल्‍या आणि त्‍यातून खरातचे पितळ उघड पडले, असे वृत्त एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिले आहे.
आज पुन्‍हा कोर्टात हजर करणार
दरम्‍यान, अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा विकृत भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलिस कोठडीची मुदत आज (मंगळवार, दि. २४) संपत आहे. दुपारी २ वाजता त्‍याला  नाशिक सत्र न्यायालयात हजर केले जाईल. न्यायालयात पोलिसांकडून काय बाजू मांडली जाते आणि पोलीस कोठडीत किती वाढ होते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. यावेळी पोलिसांकडून नवी माहिती दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button