महाराष्ट्र

भीषण हत्‍याकांडाने महाराष्‍ट्र हादरला : पोलिस मुलीने बडतर्फ पोलिस प्रियकराच्‍या मदतीने पोलिस बापाला संपवले; विष पाजून केला काढला काटा

चंद्रपूर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : प्रेमाला विरोध करणाऱ्या पोलिस पित्याची त्‍याच्‍याच मुलीने  थंड डोक्‍याने विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना तीन वर्षांनी चंद्रपुरात उघडकीस आली आहे. या मुलीला या हत्‍येत तिच्‍या पोलीस प्रियकराने मदत केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. विशेष म्‍हणजे नंतर दोघांत भांडण झाल्‍यावर त्‍यानेच ही घटना सर्वांसमोर आणली.
जयंत बल्‍लावार (४५) असे खून झालेल्‍या पोलिसाचे नाव असून, २५ एप्रिल २०२३ रोजी त्‍यांचा जिल्‍हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय भवनात चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला होता. परंतु, त्यावेळी मृत्‍यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नव्‍हते.
मात्र, आता तब्बल ३ वर्षांनी या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. जयंत बाल्‍लावार यांची मुलगी आर्या ही देखील चंद्रपूर पोलीस विभागात पोलीस कर्मचारी आहे. तर हत्‍येत सहभागी असलेला तिचा प्रियकर आशिष महेश शेडमाके (३०) याला पोलीस ट्रेनिंग दरम्यान सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. जयंत बाल्‍लावार यांचा या दोघांच्‍या प्रेमप्रकरणाला विरोध असल्याने मुलीने विष देऊन तिच्या वडिलांची हत्या केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.
मिल्कशेकधून पाजले विष  
आर्याचे आशिषशी १३ वर्षापासून प्रेमसंबंध होते. या संबंधाला वडिलांचा तीव्र विरोध होता. या विरोधाचा काटा काढण्यासाठी आर्या आणि आशिष यांनी जयंत बाल्लावार यांना विष देऊन ठार मारण्याचा कट रचला. त्‍यानुसार आर्याने मिल्‍कशेकमध्‍ये विष मिसळले आणि ते ड्युटीवर निघालेल्‍या वडिलांना पिण्‍यासाठी दिले. मिल्‍कशेक प्‍यायल्‍यानंतर जयंत बल्‍लावार ड्युटीवर गेले आणि तेथेच चक्‍कर येऊन पडल्‍याने त्‍यांचा मृत्‍यू झाला.
असा झाला उलगडा
तीन दिवसांपूर्वी जयंत बाल्‍लावार यांचा जावई आशिष शेडमाके याने सर्व गुन्ह्याची कबुली दिली. पत्नी आर्यानेच तिच्‍या वडिलांना विष देऊन मारल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे आर्याने आपला मावसभाऊ चैतन्य गेडाम याच्याकडून ५ हजार रुपयांना विष विकत घेतले होते. जयंत यांच्‍या मृत्यूनंतर आर्या व आशिषने लग्न केले. पण त्यानंतर त्यांच्या खटके उडू लागले. अशातच बेशिस्त वर्तनामुळे आशिष शेडमाकेला ट्रेनिंग दरम्यान बडतर्फ करण्यात आले. ट्रेनिंगनंतर आर्या सासरी न येता माहेरी गेल्याने संतापलेल्या आशिषने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले. त्यानंतर चंद्रपुरच्‍या रामनगर पोलिसांनी या प्रकरणी महिला पोलीस अंमलदार आर्या जयंत बाल्लावार (२२) तिचा प्रियकर आशिष महेश शेडमाके (३०), चैतन्य सचिन गेडाम (२२) आणि विष विकत देणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button