नंदुरबार शहर

नंदुरबारमध्ये अवैध धंद्यांना ऊत; एमआयएमचा संताप, सट्टा-जुगार व अमली पदार्थ विक्री थांबवण्‍याची मागणी

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरात सट्टा-जुगार व अमली पदार्थांच्या अवैध विक्री जोरदार सुरू असून, या अवैध व्यवसायांविरोधात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने शड्डू ठोकला असून, पक्षाच्‍या वतीने नंदुरबार शहर पोलिसांना निवेदन देऊन शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे.
नंदुरबार शहरात सध्या सट्टा-जुगार तसेच अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर व खुलेआम सुरू आहे. विशेषतः बसस्थानक परिसर, जळका बाजार, अमृत चौक यांसारख्या गर्दीच्या भागांत हे अवैध प्रकार बिनधास्तपणे चालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून, स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे एआयएमआयएमने नंदुरबार शहर पोलिस निरीक्षकांना दिलेल्‍या निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित ठिकाणी नियमित निगराणी ठेवावी, छापेमारी करावी आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे एआयएमआयएमच्‍या वतीने करण्यात आली आहे. तसेच, शहरातील सट्टा-जुगार व अमली पदार्थांचा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशीही विनंती करण्यात आली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button