विचारधारेचा प्रसार अन् संघटन बळकट करू; भाजप कार्यकर्त्यांचा निर्धार; डॉ. गावितांच्या निवासस्थानी पक्ष स्थापना दिन उत्साहात साजरा

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी उत्साहात कार्यक्रम पार पडला. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच पक्षाचा ध्वज फडकावत स्थापना दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. हिना गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. उपस्थितांनी पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करण्याचा आणि संघटन अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमात भाजपचे नंदुरबार तालुका अध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी, प्रवीण पाटील, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक हिरालाल चौधरी, नगरसेवक आनंदा माळी, पंकज चौधरी, नगरसेविका नीता मराठे, अविनाश माळी, उपसरपंच डॉ. मनोज गिरासे, सरपंच व्यंकट पाटील, सामाजिक कार्यकर्ते सतीश मराठे, दीपक चौधरी, गिरीश नाथ, प्रफुल्ल पाटील, किरण पाटील, दीपक गोसावी आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पक्षवृद्धीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.



