महाराष्ट्र

नंदुरबारकरांनो चला पश्चिम बंगालला; उधना ते मालदा टाउन मार्गावर सुरू झाली विशेष साप्ताहिक रेल्वे

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मध्यप्रदेश, बिहारमार्गे पश्चिम बंगालकडे जावू इच्छिणाऱ्या नंदुरबारकरांसाठी रेल्वे विभागाने स्पेशल गिफ्ट दिले आहे. गुजरात येथील उधना ते पश्चिम बंगालमधील मालदा टाऊन या मार्गावर विशेष साप्ताहिक रेल्वे सुरू करण्यात आली आहे.
उधना ते मालदा टाऊन ही ०९०३३ क्रमांकाची विशेष साप्ताहिक गाडी ९ एप्रिल ते २३ जुलै या कालावधीत धावणार आहे. ही गाडी दर गुरुवारी रात्री ११ वाजता उधना येथून सुटेल. तर ०९०३४ क्रमांकाची परतीची गाडी १२ एप्रिल ते २६ या कालावधीत दर रविवारी सकाळी ९.३० वाजता मालदा टाऊन येथून परतीचा प्रवास सुरू करेल.
या विशेष रेल्वे गाडीला नंदुरबार, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, प्रयागराज, छिक्की, पाटणा, भागलपूर आणि साहिबगंज या स्थानकांमध्ये आंबे असतील. नंदुरबार सह जळगाव व भुसावळ परिसरातील प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button