नंदुरबार शहर

नंदनगरीतील ऐतिहासिक प्राचीन दत्त मंदिराचे रूपडे पालटणार; १४ फुटांचे छत, तर ३१ फुटांचे घुमट, अक्षय तृतीयेच्‍या मुहुर्तावर पार पडले भूमिपूजन

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहरातील ऐतिहासिक, प्राचीन १३० वर्षांपूर्वीचे प्रभू श्री दत्त मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात असून, रविवारी (दि. १९) अक्षय तृतीयेचा मुहूर्तावर उद्योगपती मनोज रघुवंशी आणि इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमन कविता रघुवंशी यांच्या हस्ते नव्‍या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ‘गुरुदत्त भगवान की,जय’ असा जयजयकार करण्यात आला.
नंदुरबार शहरातील हाटदरवाजा परिसरात ऐतिहासिक असे प्राचीन १३० वर्षापूर्वीचे दत्त मंदिर आहे. मंदिराची स्थापना १८९७ साली करण्यात आली. त्यावेळेस महादू झूगाजी शिंदे, गणपत कृष्णाजी शिंदे आणि मानाजी कृष्णाजी शिंदे यांनी मंदिर बांधकामासाठी जमीन दान दिली होती. आता या मंदिराचा जीर्णोद्धार नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष, उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या आर्थिक सहकार्यातून करण्यात येत आहे.
रविवारी सकाळी भूमिपूजनापूर्वी धार्मिक पूजा विधि झाला. पौरोहित्य पंकज त्रिवेदी, जगदीश त्रिवेदी यांनी केले. याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, दत्त मंदिर संस्थानचे कार्याध्यक्ष जय शिंदे, सचिव उमेश दवे, रमेश माळी, किरण सैंदाणे, प्रकाश शिंदे, श्रीराम मोडक, अभियंता अनिल पाटील, जगदीश शिंदे, लक्ष्मीकांत शिंदे, जुगल शर्मा, श्रीराम दाऊतखाने, खगेंद्र शिंदे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
७ महिन्‍यांत होणार काम पूर्ण
भूमिपूजनानंतर आता बांधकामाला सुरुवात होईल. गतीने बांधकाम पूर्ण करण्यासाठी दत्त मंदिर संस्थान प्रयत्नशील असून, येत्या डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीपूर्वी काम पूर्णत्वास नेऊन जीर्णोद्धाराचा विधी करण्यातील येईल, असे यावेळी सांगण्‍यात येईल. मंदिराचा वाडा उभारण्‍यासाठी मंदिर संस्थान व पुजारी त्रिवेदी महाराज यांना अनेक दानशूर व्यक्तींनी त्यांना मदत केली. यात उद्योगपती मनोज रघुवंशी यांनी सढळ हस्ते मदत करतानाच जीर्णोद्धाराची संकल्पना मांडली. अन् काल रविवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भूमिपूजन पार पडले.

मंदिर जीर्णोद्धाराच्या भूमिपूजनाचा मान मिळणे, हे माझे भाग्य आहे. मंदिराचे कार्य डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास येऊन दत्त जयंतीला विधिवत जीर्णोद्धार करण्यात येईल. मंदिराचे छत हे १४ फुट तर घुमट ३१ फुटापर्यंत घेण्यात आला आहे. दाट वस्तीमुळे मंदिरात कमी प्रकाश पडणार असल्याने एक लहान घुमट पिरॅमिडचा आकारात बसवण्यात येईल. त्यामुळे मंदिरात प्रखर सूर्यप्रकाश पडेल.
– मनोज रघुवंशी, उद्योगपती

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button