नंदुरबार शहर

नंदुरबारमधील आरोग्य तपासणी शिबिराला उददंड प्रतिसाद; पहिल्याच दिवशी शंभर जणांची तपासणी; दिव्यांगांना होणार सहायक उपकरणांचे वाटप

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहरातील छत्रपती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे आयोजित भव्य आरोग्य तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद मिळत आह. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना सहाय्यक उपकरणांच्या लाभ मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या ‘अलिमको’ अंतर्गत राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून आयोजित या शिबिरात गुरुवारी पहिल्याच दिवशी १०० रुग्णांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली.
तीन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन गुरुवारी सकाळी ११ वाजता शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, नगरसेविका सोनिया राजपूत, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख पप्पू गिरासे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पावरा, सुनील गिरासे आदी उपस्थित होते.
या तीन दिवसीय शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. शिबिरात तपासणीनंतर शासनाच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना पुढील कालावधीत विविध साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
व्हील चेअर आणि बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल (८०% पेक्षा जास्त अस्थिव्यंग असलेल्यांसाठी), कानाचे मशीन, कुबडी, काठी आणि सीपी चेअर, अंधांसाठी स्मार्ट काठी, ब्रेल किट आणि १० वी नंतर शिकणाऱ्या अंध विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन, टी एलएम किट देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेकडो ज्येष्ठ आणि दिव्यांगांना मोठा आधार मिळणार आहे.

जिल्ह्यात आरोग्य शिबिराचे आयोजन व्हावे यासाठी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्‍याकडे मागणी केली होती. त्यांनी मागणी मंजूर केल्‍यानंतर जिल्हाभरात तालुकास्तरावर तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आजवर शिबिरात तब्बल ५ हजार दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात झाली. त्यातील पात्र लाभार्थ्यांना मंजूर सहायक उपकरणांचे वाटप करण्यात करण्यात आले आहे. आताही ३ दिवस चालणाऱ्या शिबिरात जास्तीत जास्त दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांनी तपासणी करावी.
– आ. चंद्रकांत रघुवंशी

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button