महाराष्ट्र

रवींद्र चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांनी रुग्णालयात जाऊन घेतली डॉ. विजयकुमार गावित यांची भेट; प्रकृतीची केली विचारपूस

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची प्रकृती वेगाने सुधारत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रुग्णालयात जाऊन डॉ. गावित यांची भेट घेत त्‍यांच्‍या प्रकृतीची आस्‍थेवाईपणे चौकशी केली. याआधी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते हर्षवर्धन पाटील यांनीही रुग्‍णालयात जावून डॉ. गावित यांची भेट घेत त्‍यांना लवकर बरे होण्‍यासाठी शुभेच्‍छा दिल्‍या.
आ. डॉ. गावित यांच्या प्रकृतीत दोन महिन्यांपूर्वी हृदयविकारामळे बिघाड झाला होता. त्‍यावर उपचार सुरू असल्यामुळे ते मुंबई येथील रुग्णालयात दोन महिन्यांपासून दाखल आहेत. पूर्वीपेक्षा आता वेगाने प्रकृतीत सुधार होत असून सर्व प्रकारच्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत. व्हिडिओ कॉलद्वारे ते त्यांची भेट घेऊ इच्छिणार्‍यांशी संवाद साधत आहेत. शिवाय माजी खा. डॉ. हिनाताई गावित यांच्या फोनवरून ते विविध बैठक मेळाव्यांमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करीत आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज रुग्णालयात जाऊन डॉ. गावित यांना भेटले. यावेळी दोघांत काही मुद्द्यांवर चर्चा झाली. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. कुमुदिनी गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित उपस्थित होते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button