महाराष्ट्र

नंदुरबारचे वैद्यकीय महाविद्यालय वेळेत पूर्ण करा; कामात तडजोड खपवून घेणार नाही; हसन मुश्रीफांनी अधिकार्‍यांना भरला दम

नंदुरबार / मुंबई (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबारमध्‍ये उभारण्‍यात येत असलेल्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्‍न रुग्‍णालयाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल, या दृष्‍टीने प्रयत्‍न करावेत. या कामात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्‍दांत राज्‍याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नंदुरबारच्‍या वरिष्‍ठ अधिकार्‍यांना सूचना केल्‍या.
नंदुरबारच्‍या नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्‍णालयाच्‍या कामाचा आढावा मुश्रीफ यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. बांधकामाची सद्यस्‍थिती, निधी, पाणी व वीजपुरवठा आदींबाबत या प्रसंगी सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागाचे सचिव धीरज कुमार, अन्‍य संबंधित अधिकारी उपस्‍थित होते. नंदुरबारच्‍या जिल्‍हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. संजय राठोड ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभागी झाले होते.
सर्व संबंधित यंत्रणांनी परस्‍परांशी समन्‍वय राखून वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या कामांना गती देवून महाविद्यालयाची उभारणी वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे, महाविद्यालयाच्‍या कामांसाठी रस्‍ते, वीज व पाणी वेळेत आणि पुरेसे उपलब्‍ध याची काळजी जिल्‍हाधिकारी, अधिष्‍ठाता आणि संबंधित विभागाच्‍या अधिकार्‍यांनी घ्‍यावी, निधी वितरण व प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया गतिमान करावी, अशी सूचना करतानाच मुश्रीफ यांनी कामाच्‍या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड स्‍वीकारली जाणार नाही, अशा कडक सूचनाही यावेळी अधिकार्‍यांना केल्‍या.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button