राजकारण

पक्षात टिकायचे, पुढे जायचे तर काम करून दाखवा; प्रभागात महिला सक्षमीकरण वाढवा; शिवसेनेच्‍या समन्‍वयिका सरिता कोल्हे यांची नंदुरबारच्‍या नगरसेविकांना सूचना

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शासनाच्‍या योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवायच्‍या असतील तर पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांना अधिक जोमाने काम करावे लागेल. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी नेहमी सज्ज राहायला हवे. पक्षात टिकायचे आणि पुढे जायचे असेल तर आता काम केल्याशिवाय पर्याय नाही. पक्षाच्‍या प्रत्‍येक नगरसेविकेने आपल्या वार्डात महिला सक्षमीकरणाचे काम करताना किमान २५ महिलांची टीम बनवावी. त्यांना सोबत घेत संघटन मजबूत करावे, अशा सूचना शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वयक सरिता कोल्हे- माळी यांनी केल्या.
नंदुरबारमधील शिवसेना महिला आघाडीची बैठक शिवसेना भवन, आमदार कार्यालयात पार पडली. यावेळी बैठकीत संघटनात्मक चर्चा पार पडली. यानंतर उपस्‍थितांना मार्गदर्शन करताना सरिता कोल्हे बोलत होत्या. बैठकीच्‍या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी होत्‍या. प्रस्तावना महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत यांनी केली. या बैठकीत महिला संघटन वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी म्हणाल्या, पक्षात पुरुष मंडळी ज्याप्रमाणे काम करतात, अगदी तसेच किंबहुना त्‍याहून कांकणभर सरस असे काम महिला आघाडीच्‍या पदाधिकार्‍यांनी करावे, अशी अपेक्षा आहे. विविध विकासात्मक कामांच्या माध्यमातून महिलांनी नारी शक्तीचे कार्य जनमानसापर्यंत पोहोचवावे. यावेळी नगरसेविका सोनिया राजपूत, मनीषा गिरासे, रेखा चौधरी, मनीषा वळवी, सायली रघुवंशी, सकीनाबी कुरेशी, ज्योती पाटील, युवती सेना जिल्हाप्रमुख राजश्री मराठे, महिला शहर प्रमुख वैशाली माळी, काजल मच्छले आदी महिला पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button