महाराष्ट्र

धक्‍कादायक : अपात्र लाडक्‍या बहिणींकडून सरकारी तिजोरीवर २७ हजार कोटींचा दरोडा; अपात्र असूनही २२ महिने घेतला योजनेचा लाभ; १४ हजार पुरूषांचाही समावेश

मुंबई (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्‍या लाभासाठी अपात्र ठरलेल्‍या राज्‍यभरातील तब्‍बल ८१ लाख ‘लाडक्‍या बहिणीं’नी तब्‍बल सुमारे २७ हजार कोटी रुपयांची रक्‍कम लाटल्‍याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. अर्थात, असे असले तरी सरकारी तिजोरीवर दरोडा टाकणार्‍या या बोगस महिला लाभार्थ्यांकडून या २२ महिन्‍यांत अदा करण्‍यात आलेली रक्‍कम वसूल न करण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला आहे.
राज्‍य सरकारने मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्‍यानंतर राज्‍यभरातील लाखो महिलांना त्‍याचा फायदा झाला. या योजनेच्‍या पात्रतेसाठी अनेक निकष निश्‍चित करण्‍यात आले होते. मात्र, त्‍यातील त्रुटींचा गैरफायदा घेत अनेक बोगस लाभार्थींनी तब्‍बल २२ महिने या योजनेचा २६ हजार ७३० कोटी रुपयांचा निधी लाटला. यात अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्‍पन्न असलेल्‍या १० लाख महिला, सुमारे ५ लाख सरकारी कर्मचारी तर १४ हजार पुरूष मंडळींचा समावेश होता. तर योजनेचा लाभ घेण्‍यासाठीची योग्‍य कागदपत्रे सादर करण्‍यासाठी वेळोवेळी मुदत देऊनही या कागदपत्रांची पूर्तता न करणार्‍या तब्‍बल ६५ लाख महिला या योजनेतून बाद झाल्‍या. शिवाय २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्‍पन्न असलेल्‍या ९.५ लाख महिलांचा या योजनेचा लाभ बंद करण्‍यात आला.
पुरूषांकडून वसुली करणार…
मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्‍या महिलांकडून आतापर्यंत देण्‍यात आलेल्‍या योजनेच्‍या लाभाचे पैसे वसूल न करण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला आहे. मात्र, सरकारी यंत्रणेची दिशाभूल करून योजनेचा लाभ लाटणार्‍या १४ हजार पुरुषांकडून दिलेल्‍या रकमेची राज्‍य सरकार वसूल करणार आहे. अर्थात, ही रक्‍कम वसूल कशी करायची असा प्रश्‍न मात्र राज्‍याच्‍या महिला व बालकल्‍याण विभागाला पडला आहे. अर्थात, असे असले तरी सरकारी नोकरीतील महिला आणि पुरूष लाभार्थींकडून दिलेल्‍या रकमेची वसुली केली जाणार असल्‍याचे राज्‍य सरकारने स्‍पष्‍ट केले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button